मोहोळ / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखाना दरवेळे प्रमाणे चालू गठीत हंगामातही जिल्ह्यातील उच्चांकी दर देण्यास वचनबद्ध आसल्याची ग्वाही देत शेतक-यांनी परिपक्व ऊस देऊन कारखाना व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी केली.
जकराया साखर कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा कारखाना स्थळावर संपन्न झाला. यावेळी जाधव बोलत होते. यावेळी उमादेवी जाधव, कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, डॉ. बाळासाहेब सरवळे, श्रीधर माने, अंकुश आवताडे, प्रमोद आवताडे, ज्ञानेश्वर पाटील, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब वावर, आदी यावेळी उपस्थित होते.
कारखान्याचे वांगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील सभासद बनसिद्ध जवळकोटे व त्यांच्या पत्नी शांताबाई जवळकोटे आणि राहुल जाधव व प्रियंका जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कारखान्याच्या बॉयलरचा अग्नी प्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना अॅड. जाधव म्हणाले, यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांची वरदायिनी असलेले उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.
जकराया शुगरच्या माध्यमातून वडापूर येथील बंधा-याची देखभाल केल्याने या परिसरातील ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतक-यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करण्यास काहीही हरकत नाही, जकराया कारखान्याने या वर्षीही मोहोळ तालुक्यात पहिल्या क्रमांकाचा आणि वेळेवर दर देण्याची परंपरा कायम राखली असल्याने शेतक-यांनी जकराया कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देण्याचे आवाहन अॅड. जाधव यांनी केले. सन २०२४-२५ सालच्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी दोनशे ट्रॅक्टर, तीनशे बैलगाडी आणि दीडशे डपींग ट्रॅक्टरचे करार करण्यात आले आसल्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले, काटेकोर नियोजनाच्या जोरावर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन केले असल्याने त्यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत सरवळे, भानुदास गावडे, नामदेव गायकवाड, रफिक पाटील, प्रभाकर पाटील, सिद्धेश्वर मोरे, दीपक माने, बसवेश्वर पुजारी, रघुनाथ होणराव, समाधान महाडकर, आण्णासाहेब पाटील उपस्थित होते.
गेल्या वर्षीच्या गळीतहंगामात काटेकोर नियोजन
करून सर्व शेतक-यांचा ऊस वेळेत गाळपास आणून सालाबादप्रमाणे यंदाही मोहोळ तालुक्यातील इतर कारखाण्यापेक्षा उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल कारखाण्याच्या सर्व ऊस पुरवठादार शेतक-यांनी सचिन जाधव यांना उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत सरवळे यांच्या हस्ते सत्कार करून गौरवले.