28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअब्दुल सत्तार बिघडविणार भाजपचा खेळ ?

अब्दुल सत्तार बिघडविणार भाजपचा खेळ ?

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मंत्री अब्दुल सत्तार हे येणा-या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक मतदारंसघात भाजपचा खेळ बिघडवणार? असे दिसते. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सत्तार यांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर आता ते देखील ‘करारा जवाब’ देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे भोकरदन-जाफ्राबादचे विद्यमान आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघात जाऊन सुपडा साफ करण्याचा इशारा अब्दुल सत्तार यांनी काही दिवसापुर्वी दिला होता.

शिवसेनेकडून वर्षभरापासून बलांडे हे फुलंब्रीतून विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आणि हे तीनही पक्ष विधानसभा निवडणुक एकत्रित लढवणार असल्याने बलांडे यांची अडचण होणार आहे.

सत्तार यांनी आपला मोर्चा आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाकडे वळवला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक किशोर बलांडे यांना विधानसभेसाठी बळ देणे सुरू केले आहे.

मात्र अब्दुल सत्तार यांनी बलांडे यांच्यासाठी भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही, तर किशोर बलांडे हे अपक्ष निवडणूक लढवतील आणि आम्ही त्यांना निवडून आणू, असा दावा अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे केला आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांचा राजकीय वारस कोण ठरणार?

यासाठी पक्षात डझनभर इच्छुकांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. असे असतांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अचानक आपला मोर्चा फुलंब्रीकडे वळवला आणि थेट बंडाची भाषा सुरू केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी अब्दुल सत्तार यांनी २५ कोटींचा निधी दिला. यातून केल्या जाणा-या विविध विकासकामांचे भुमीपूजन आज सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या बिनधास्त आणि सडेतोड बोलण्यासाठी ओळखल्या जाणा-या अब्दुल सत्तार यांनी भाजपकडे असलेल्या फुलंब्री विधानसभेच्या जागेवर दावा सांगितल्याचे स्पष्ट करतानाच किशोर बलांडे हे आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR