30.5 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeलातूरअहमदपुरात गुटखा, बैल, टेंपोसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपुरात गुटखा, बैल, टेंपोसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर : प्रतिनिधी
अहमदपूर येथे नाकेबंदी करुन  पोलिसांनी प्रतिबधित गुटखा (अंदाजे २१ लाख ५२ हजार ८०० रुपये) कार, दहा बैलांसह टेम्पोसह जवळपास २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले असून त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली  नाकेबंदी पथकाने  कारवाई केली. दि १७ एप्रिल रोजी १ वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी कर्तव्यावर असलेले पोहेका. केंद्रे ,पोहेका. मामडगे ,पोहेका. काळगे यांना संशयित वाहन आल्यानंतर त्यास थांबण्यास सांगितले असता ते न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना  त्यास काही अंतरावर पकडून विचारपूस केली असता त्यामध्ये दोन चालक व मुद्देमसल आढळून आला.
गुटखा विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना रफिक अब्दुल शबीर वय ३३ वर्ष राहणार अमरावती, अलोक राजेश्वर रेड्डी वय ३६ वर्ष राहणार शिरूर ताजबंद ,योगेश नितीन यादव वय २५ वर्ष राहणार लोहा तसेच प्रवीण कच्छवे यांनी तक्रार केल्यावरून ही कार्यवाही करण्यात आली.  सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे शका शिवाजी गुंडरे हे करीत आहेत. यामध्ये अहेमद शबी तांबोळी शेख वय ३३ वर्ष, व्यवसाय चालक राहणार नेकनूर यास ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR