40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeलातूरलातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे १९ एप्रिल रोजी...

लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४१-लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी  बंडाप्पा काळगे शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भव्य रॅली काढून महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यानंतर जाहीर सभा होणार आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या नामांकन अर्ज मिरवणूक व जाहीर सभेला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, व्यापारी, व्यावसायिक, महिला, मजूर यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
गंजगोलाई येथे आई जगदंबेची महाआरती करुन रॅलीला सुरुवात होणार आहे, त्यानंतर रॅली हनुमान चौक मार्गे, महात्मा गांधी चौक, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सहकार महर्षी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मो. अरिफ (नसीम) खान, माजी मंत्री आमदार अमित विलासराव, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोर, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे लोहा कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे, शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार दिनकर माने, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार ईश्वर भोसीकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांचा नामांकन अर्ज मिरवणूक काढून भरण्यात येणार आहे, त्यानंतर जाहीर सभा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR