22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरअहिल्याबाई प्र.शा.लेला बेसबॉल मध्ये दुहेरी मुकुट

अहिल्याबाई प्र.शा.लेला बेसबॉल मध्ये दुहेरी मुकुट

सोलापूर : महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत शालेय शहरस्तर बेसबॉल स्पर्धा मल्लिकार्जुन प्रशाला हत्तुरे नगर, सोलापूर येथे पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने सॉफ्टबॉल मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेते पद मिळवत यश संपादन केले.विजय टीम मध्ये रागिनी सलवदे (कर्णधार) प्रणिती शिंदे, रिजवाना शेख, सृष्टी मस्के, नादिया नदाफ, सिमरन पटेल, अर्चना काटम, पूनम बगले, शितल गायकवाड, कोमल भडंगे, अफरोज पठाण, सानिया शेख, श्रेया बनसोडे, लक्ष्मी गायकवाड, दिव्या गायकवाड,जास्मिन सय्यद या खेळाडूंनी उत्कृष्ट केळी करत फायनल पर्यंत धडक मारली व उपविजेतेपद मिळविले.

या यशाबद्दल विजय संघातील खेळाडूंचे संस्थापक सचिव हाजी बी.एम.शेख सर, प्राचार्य इस्माईल शेख, प्रा.अनंत सुरते,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विजय संघाला क्रीडा शिक्षक रमेश हेगडे व क्रीडा शिक्षक व कोच प्रा.धनंजय धेंडे महिला कोच सना कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR