18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआगामी निवडणुकीत ‘मनसे’ महायुतीसोबत!

आगामी निवडणुकीत ‘मनसे’ महायुतीसोबत!

महापालिका निवडणूक तयारीचे संकेत

मुंबई : विशेष प्रतिनिधी
लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळालेल्या भरीव यशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले. या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकांसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदा आम्हाला झाला तसेच त्यांचा पक्षालाही झाला. विधानसभेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी पक्ष काढला. त्यामुळे त्यांनाही निवडणुका लढवाव्या लागल्या.

विधानसभा निवडणुकीत आम्ही तीन मोठे पक्ष होतो. त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या. त्यामुळे राज ठाकरे स्वतंत्र लढले. त्यांना या निवडणुकीत मते चांगले मिळाली. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तेथे तेथे त्यांच्याशी युती करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण रखडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ईव्हीएमवर होणा-या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, ईव्हीएमवर बोलण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. एकाच दिवशी झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. ते झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले असल्याचे म्हटले जाते. परंतु महाराष्ट्रात पराभव झाला तर ईव्हीएमचा घोळ असल्याचे म्हटले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR