16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रआचारसंहिता असूनही शासन निर्णयाचा धडाका

आचारसंहिता असूनही शासन निर्णयाचा धडाका

निवडणूक आयोग कारवाई करणार?
मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उचलताच राज्य सरकारची धावाधाव सुरू झाल्याचे दिसून आले. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतरही राज्य सरकारने बुधवारीदेखील अनेक शासन निर्णय जारी केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला विचारणा करताच सर्व शासन निर्णय वेबसाईटवरून हटवण्यात आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केली. त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहून शासन निर्णय किंवा कुठलेही टेंडर काढू नये, असे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत राज्य सरकारच्या अनेक विभागाने बुधवारीही शासन निर्णय जारी केले होते. राज्य सरकारच्या वतीने शासन निर्णयासोबतच अनेक टेंडर आज वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आहेत. यावरती निवडणूक आयोग आता कारवाईचा बडगा उचलणार आहे.

चौकशी करून कारवाई करू
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आपल्या इतर सहका-यांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारने एखाद्या योजनेचा जीआर काढला असेल तर कारवाई कराल का, असा प्रश्न निवडणूक अधिका-यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आचारसंहिता लागल्यानंतर जीआर काढता येत नाही. तसे झाले असेल तर चौकशी करून कारवाई करू, असे चोकलिंगम म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR