22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeलातूरआमदार बाबासाहेब पाटील यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

आमदार बाबासाहेब पाटील यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

अहमदपूर : प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांनी सोमवार दि.२८  रोज सोमवारी शक्ती प्रदर्शन करीत वाजत गाजत रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या रॅलीनंतर निजवंते नगर, थोडगा रोड येथे जाहीर सभेमध्ये रूपांतर झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव हे होते तर मंचावर नामदार धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार विक्रम काळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ माने, रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, अशोकराव केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. जाहीर सभेत बोलताना नामदार धनंजय मुंडे म्हणाले की, महायुती सरकारने मागील काळात महिलांसाठी, शेतक-यांसाठी, युवकांसाठी विविध योजना आणल्या असून या योजना पुढील काळात सुरू राहण्यासाठी महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. सर्वधर्मसमभाव मानणा-या व विकासाची हातोटी असलेल्या आमदार बाबासाहेब पाटील यांना मतदान करावे असे जाहीर आवाहन करतानाच त्यांनी आमदार पाटील यांना तिस-यांदा निवडून द्या अशी विनंती केली.
यावेळी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, काम ही माझी जात असून मतदारसंघासाठी मी मागील पाच वर्षाच्या काळात अडीच हजार कोटीची कामे केली आहेत. अहमदपूर चाकूर शहरात प्रशासकीय इमारत व पंचायत समिती कार्यालयाची इमारत करून नागरिकांची कामे सोपी केली असून अहमदपूर व चाकूर शहरातील एमआयडीसी पूर्णत्वाकडे घेऊन जाणार आहे. भविष्यामध्ये मला सिंंचनासाठी अंतेश्वर बांधा-यांतून चाकूर, अहमदपूर तालुक्यासाठी पाणी उपलब्ध करावयाचे असून यातून २५ हजार एकर जमीन ओलिताखाली येऊन कायापालट करणार असल्याचा संकल्प आहे.
यासोबतच शिक्षणासाठी सर्व समाजासाठी अद्यावत शैक्षणिक संकुलनासाठी पोषक वातावरण, मुलींसाठी वस्तीगृह बनवायचे आहे. आम्ही जातीपातीचे राजकारण करीत नसून अठरापगड जातीला सोबत घेऊन समाजाची उन्नती करण्याकडे प्रयत्नशील राहत असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक संकुले, बँक, साखर कारखाना, दुग्ध व्यवसाय यामधून अनेकांच्या हाताला रोजगार देण्याचे काम केलं आहे. मागील काळात मी काम केले असे वाटले तर मला मतदान करा असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.
   या वेळी सभापती मंचकराव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मीनाक्षी शिंगडे,  माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, शाहू कांबळे, अनुराधा नळेगावकर, सुप्रिया भालेराव, मिंिलंद महांिलगे, सुरज पाटील, शिवाजी देशमुख, शिवाजी काळे, राजकुमार मजगे, अजहर बागवान, शिवाजी खांडेकर, अभय मिरकले, सुप्रिय बनसोडे, अ‍ॅड.टी.एन. कांबळे, सरपंच सूर्यकांत चव्हाण, अमित रेड्डी, निखील कासनाळे, आशिष तोगरे, राम नरवटे, बाळासाहेब लखनगीरे  यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR