30.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रआरोपी दत्तात्रय गाडेचा तरुणीवर दोनदा अत्याचार

आरोपी दत्तात्रय गाडेचा तरुणीवर दोनदा अत्याचार

स्वारगेट प्रकरणात पीडितेचा वैद्यकीय अहवाल समोर

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, स्वारगेट प्रकरणात पीडितेचा वैद्यकीय अहवाल ससुन रुग्णालयाने पोलिसांना दिला आहे. या अहवालात आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

तर दुसरीकडे या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी कारवाई करत स्वारगेट डेपोमधील २३ सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून तसेच डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. २३ सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून त्यांच्या जागी स्वारगेट डेपोमध्ये नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचाराची घटना घडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR