वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमध्ये अखेर युद्ध विरामाची घोषणा करण्यात आली आहे. युद्ध विराम झाल्याची अधिकृत घोषणा देखील इराणकडून करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली आहे.
युद्ध विरामाचे आता उल्लंघन करू नका असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांनी या १२ दिवसांच्या संघर्षाला ‘बारा दिवसांचे युद्ध’ असे संबोधले आणि इराण आणि इस्रायल दोघांच्याही ‘लवचिकता, धैर्य आणि बुद्धिमत्तेचे’ कौतुक केले.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू होते. इराण आणि इस्रायलने एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांत दोन्ही देशांचे मोठे नुकसान देखील झाले. दरम्यान या युद्धात अमेरिकेने देखील उडी घेत इराणच्या ३ अणुकेंद्रांवर हल्ले केले होते. मात्र आता हे युद्ध थांबवण्यात आले असल्याचे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. त्यानंतर इराणने देखील याबद्दल अधिकृत घोषणा करत युद्धबंदी झाल्याचे म्हटले आहे.