25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइराणी तेल, गॅसवर प्रभुत्व; चीन, रशियाला झुकवणे ही ट्रम्पनिती!

इराणी तेल, गॅसवर प्रभुत्व; चीन, रशियाला झुकवणे ही ट्रम्पनिती!

अमेरिकेच्या हल्ल्यामागे अण्वस्त्र हा तर बहाणा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला असल्याचा दावा करत आधी इस्राइल आणि आता अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केले. मात्र अणुबॉम्ब हा केवळ इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने शोधलेला बहाणा आहे. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर हल्ला करण्यामागचा खरा हेतू काही वेगळाच असल्याचा दावा केला जात आहे.

आखाती देशांमधील बहुतांश भाग हा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांनी समृद्ध आहे. त्यामुळे आपले तिथले वर्चस्व भक्कम करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. एवढंच नाही तर इराणमध्ये वर्चस्व प्रस्थापित करून चीन आणि रशियाला कमकुवत करण्यासाठीही अमेरिका सतत प्रयत्नशील आहे.

इराणमधून दररोज ३.३ दशलक्ष बॅरल एवढे खनिज तेल उत्पादित केले जाते. इराण दररोज २ दशलक्ष बॅरल खनिज तेल आणि शुद्धिकरण केलेल्या तेलाची निर्यात करतो. त्यामधून इराणची अर्थव्यवस्था चालते. इराणमध्ये आपल्याला हवे तसे सत्तांतर घडवून तिथल्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचा हेतू आहे.

इस्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला. दरम्यान, हा असा भाग आहे, जिथून जगाच्या एकूण खनिज तेलाच्या उत्पन्नापैकी २६ टक्के खनिज तेल मिळते. सौदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती या जगातील आघाडीच्या १० खनिज तेल उत्पादक देशांमध्ये समावेश होतो. मात्र इस्राइल आणि इराणमधील संघर्षामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी अणुबॉम्बचे कारण दिले असले तरी इराणमध्ये मुबलक प्रमाणात असलेले खनिज तेलाचे साठे हेही या हल्ल्यामागचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR