मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी पार पडत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान, आज (दि. ०५) महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. निकालाच्या बारा दिवसांनंतर अखेर महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केला असून सरकार स्थापन करणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला येणार आहेत.
आज होणा-या शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ तीन नेते शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीस यांची निवड झाल्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर अजित पवार हे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे कोणत्या पदाची शपथ घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.