करपलेले सोयाबीन जाळून शेतक-यांचा रास्ता रोको

औसा : प्रतिनिधी
मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिका-यांसह शेतक-यांनी बुधवारी दुपारी औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तावशी ताड येथे रस्ता रोको आंदोलन केले. पावसातच झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी करपलेले सोयाबीनचे पीक महामार्गावर जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. अचानक करण्यात आलेल्या रस्ता रोकोमुळे औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, दि. २१ सप्टेंबरपासून तावशी ताड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुस-या दिवशी बुधवारी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी जमले. पावसाची पर्वा न करता त्यांनी औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करून शासनाचे लक्ष शेतक-यांच्या प्रश्नांकडे वेधले. यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषत: सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आणि मूग पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक भागांत पिके करपली आहेत. त्यामुळे शेतक-यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतक-यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
छावा संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये मराठवाड्यासह लातूर जिल्ह्या कोरडा दुष्काळ जाहीर करणे, शेतक-यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये अनुदान देणे, सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांचा प्रलंबित पीकविमा तातडीने देणे तसेच नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणे, या मागण्यांचा समावेश आहे.  रस्ता रोकोदरम्यान आंदोलकांनी करपलेले सोयाबीन औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच जाळून शासनाचे लक्ष शेतक-यांच्या नुकसानीकडे वेधले. ‘दुष्काळ जाहीर करा’, शेतक-यांना तातडीने मदत द्या’, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिका-यांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूर–जहीराबाद महामार्गावर खळबळ! पोत्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
01:26
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये HomeLane च्या पहिल्या Experience Centre चं उद्घाटन | AI Home Interiors
08:24
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ६२% मतदान | ४१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत
01:36
Video thumbnail
Nanded News|नांदेडमध्ये चारा तस्करी उघड! दोन ट्रक जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
04:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘लखन मेकअप’चं शानदार उद्घाटन | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
02:50
Video thumbnail
Latur Graduate Constituency Election | दुपारी १२ पर्यंत १९.३३% मतदान | Latur News
06:48
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44

Latest news