25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रकोंढव्यात २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

कोंढव्यात २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरात घुसला आरोपी

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील कोंढवा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणा-या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात तरुणाने अत्याचार केला. विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वत:चा सेल्फी काढून ‘मी पुन्हा येईन’ असा संदेश ठेवला आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका गार्डेड सोसायटीमध्ये ही घटना घडली. आरोपीने स्वत:ला डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दरवाजावर पोहोचल्यावर त्याने पीडित तरुणीला ‘कुरिअर आहे’ असे सांगितले. तरुणीने ‘हे कुरिअर माझे नाही’ असे स्पष्ट सांगून नकार दिला. मात्र आरोपीने ‘सही करावी लागेल’ असा आग्रह धरला.

तरुणीच्या तोंडावर फवारला केमिकल स्प्रे
आरोपीने ‘सही करावी लागेल’ असा आग्रह धरला. त्यामुळे नाइलाजाने तिला सेफ्टी डोअर उघडावे लागले. त्याच क्षणी आरोपीने तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे फवारला. यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर आरोपीने अत्यंत निर्ढावलेपणाने पीडितेच्या मोबाईलमध्ये स्वत:चा सेल्फी काढला. तसेच ‘मी पुन्हा येईन’ असा मजकूर टाईप करून ठेवला.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू
कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR