सातारा : प्रतिनिधी
शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने ५० टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे पाणी साठा वेगानं वाढत आहे.
सध्या धरणात ५१.२० टीएमसी एवढा पाणीसाठा आहे, तर धरणात प्रतिसेकंद २१ हजार २८१ क्युसेक इतकी आवक सुरू आहे. चोवीस तासात २ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.
कोयना धरण हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे धरण असून कोयनेचा पाणीसाठा ५० टीएमसी पर्यंत पोहोचणे ही एक चांगली बातमी आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्याची जून महिन्यातच हाफ सेंच्युरी झाली असून धरण निम्मं भरले आहे. अजून पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीची चिंता मिटली आहे.