37.9 C
Latur
Monday, April 14, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात ‘कोयना एक्स्प्रेस’ने तिघींना चिरडले

कोल्हापुरात ‘कोयना एक्स्प्रेस’ने तिघींना चिरडले

दोन महिलांसह लहान मुलगी जागीच ठार

कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसने काल (शुक्रवार) रात्री तिघांना चिरडले आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्डजवळ रात्री झालेल्या या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याचे काहींनी सांगितले. मुंबईहून कोल्हापूरला येणारी कोयना एक्स्प्रेस मार्केट यार्डपासून पुढे कोल्हापूर स्थानकाच्या दिशेने येत होती. याचवेळी विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने या तिघीजणी रुळावरूनच चालत जात होत्या. याचवेळी भरधाव आलेल्या कोयना एक्स्प्रेसने तिघींनाही चिरडले.

या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला, तर दुसरी महिला आणि लहान मुलगी दुस-­या बाजूला पडल्या. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने दोन महिलांचे चेहरे छिन्नविच्छिन्न झाले. तर, लहान मुलगीही जागीच ठार झाली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी आणि शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अजय सिंदकर सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR