धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील कोळेवाडी येथे ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून तिरट जुगार खेळणा-या सात जणांवर कारवाई केली. पोलीसांनी यावेळी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम साडेसहा जप्त केली. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाणे येथे सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी धाराशिव तालुक्यातील कोळेवाडी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी रेवणसिध्द विठ्ठल आकोसकर (रा. कोळेवाडी), सोमनाथ धोंडीराम वाघामारे (रा. रामवाडी),आगतराव भिमराव गोरे (रा. गोरेवाडी), सुरेश राम कोळी (रा. कोळेवाडी), काका मारुती देवकते व महादेव अर्जुन शेळके, भागवत प्रभाकर भक्ते, (तिघे रा. तेर) हे कोळेवाडी शिवारातील रेवणसिध्द आकोसकर यांचे शेतालगत बाभळीचे झाडाखाली तिरट जुगार खेळत होते. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम ६ हजार ५०० रूपये जप्त केली.
दुस-या घटनेत तेर ता. धाराशिव येथील पंपहाऊस समोर कल्याण मटका घेणा-या बालाजी जिन्नस शिरगिरे याच्यावर ढोकी पोलीसांनी कारवाई केली. त्याच्या ताब्यातून कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम २ हजार शंभर रूपये जप्त केली. या प्रकरणी पोलीसांनी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.