अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार डच्चू

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम मंर्त्यांच्या कामांवर एकनाथ शिंदे नाराज आहेत. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून लवकरच शिंदेसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

असे देखील सांगितले जात आहे की, तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर काही राज्यमंर्त्यांना कॅबिनेटमंत्री पद देत त्यांची पदोन्नती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या मंर्त्यांना डच्चू दिला जाणार आहे त्या यादीमध्ये संजय शिरसाट, संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांची नावं असल्याचे सांगितले जात आहे. राज्यमंत्रिपदी असलेले योगेश कदम, आशिष जयस्वाल या दोघांना राज्यमंत्रिपदावरून थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर काही नव्या आमदारांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील शिंदेसेनेतील मंर्त्यांच्या कामगिरीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मंर्त्यांची बैठक बोलावून नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कामकाजात सुधारणा करण्याची तंबी दिली. जनतेची कामं, मतदारसंघातील प्रश्न आणि पक्षसंघटनेच्या वाढीकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही कामगिरी सुधारली नाही तर मंत्रिपद गमवावे लागू शकते, असा इशारा शिंदेंनी दिल्याचे वृत्त आहे.

दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे. असे असताना शिंदेसेनेच्या मंत्र्यांना आपले मतदारसंघ सोडूशी वाटत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत या मंर्त्यांना तंबी दिली होती. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मंत्री जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांचे दौरे का करत नाही? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केला होता. ज्या मंत्र्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे त्या मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करण्याचे आदेश शिंदेंनी दिले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12
Video thumbnail
माहूरजवळ भीषण अपघात | एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी | Nanded News Today
02:03
Video thumbnail
Latur|समान वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रम;कवेतनातील तफावत कधी मिटणार?
06:30
Video thumbnail
Nanded Sand Mafia Action | आठ बोटी ब्लास्ट करून नष्ट | LCB Raid | Nanded News
00:48
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये १४.४८ लाखांचा गुटखा जप्त | बोलेरोसह मुद्देमाल ताब्यात | Latur News
01:42
Video thumbnail
'गोविंदा' अन् 'उदो उदो'च्या जयघोषात अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
00:56
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10

Latest news