गणेश विसर्जनासाठी लातूर जिल्हा पोलिस दलाचा तगडा बंदोबस्त

लातूर : प्रतिनिधी
श्री गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाकडून व्यापक व काटेकोर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी होणा-या गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडाव्यात, यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १ अपर पोलीस अधीक्षक, ९ पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक, ८० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच १० नवप्रविष्ट पोलीस उपनिरीक्षक, असे १२१ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय १ हजार ३७० पोलीस अंमलदार, १०० प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार आणि १ हजार ०४० होमगार्ड यांचीही बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबत राज्य राखीव पोलीस दलाची १ तुकडी आणि शीघ्र कृती दलाच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांच्या अनुषंगाने मिरवणूक मार्ग, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, विसर्जन स्थळे तसेच आवश्यक त्या संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरवणुकीची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित  ठेवण्यासाठी परिस्थितीनुसार अतिरिक्त बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात आली आहे.  विसर्जनाच्या दिवशी शहर तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सतत गस्त घालण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग, संवेदनशील भाग आणि प्रमुख चौकांवर पोलिसांची विशेष देखरेख राहणार आहे. आवश्यकतेनुसार तातडीने अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात झाडातून अवतरले गणराय; अनोख्या देखाव्याने वेधलं लक्ष!
04:37
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:45
Video thumbnail
Latur| डुप्लिकेट आमदारांना सांभाळू नका; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर अभय साळुंके थेट बोलले
08:03
Video thumbnail
Latur|लातूर-तुळजापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
03:13
Video thumbnail
Latur|नानिकभाई जोधवानी यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
05:07
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या आठवणींना काँग्रेस नेत्यांकडून उजाळा
05:40
Video thumbnail
Latur|लक्ष्मण ढोबळेंच्या वक्तव्याविरोधात महिलांचा संताप
02:00
Video thumbnail
Latur|महादेव उबाळे यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील आरती संपन्न
08:58
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19

Latest news