21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरग्रामदैवताच्या साक्षीने अनुभवला श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

ग्रामदैवताच्या साक्षीने अनुभवला श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

लातूर : प्रतिनिधी
अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे सोमवारी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. लातूर येथे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर मंदिर येथे भव्य स्क्रीनवरुन थेट प्रक्षेपण पाहत हजारो नागरिकांनी ग्राम दैवताच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा अनुभवला. याप्रसंगी हजारोंच्या उपस्थितीत एकाचवेळी यज्ञ, रामरक्षा पाठ आणि श्रीराम आरतीदेखील करण्यात आली.
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यांच्या वतीने श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या सभामंडप परिसरात भव्य स्क्रीन उभारण्यात आला होता यावरुन अयोध्या येथील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्यात आले होत. यावेळी हजारो लातूरकरांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. मंदिर परिसरात नाविण्यपूर्ण पुष्प सजावट करण्यात आली होती. अतिशय मंगलमय वातावरणात यज्ञाचेही आयोजन करण्यात आले होते. मंदिर जीर्णोद्धार करिता देणगी दिलेल्या विशेष ९ यजमानांच्या हस्ते यज्ञ करण्यात आला. यात रमेश बियाणी, विश्वनाथ निगुडगे, मंथराज भुतडा, अमित देवणे, कीर्तीकुमार देवणीकर, तुकाराम जगताप, संतोष बादाडे, आदर्श फावडे, विक्रांत गोजमगुंडे यांनी सपत्नीक सहभाग घेतला.
अयोध्या येथे यज्ञ कार्यात एक महिना सहभाग घेतलेले पंडित श्रीनिवास कुलकर्णी हे मुख्य पुरोहित होते. त्यानंतर हजारो लातूरकरांनी एकाचवेळी रमारक्षा पाठ केला आणि अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा थेट प्रक्षेपणद्वारे याची देही याची डोळा अनुभवला. त्यानंतर श्रीराम आरती करण्यात आली आणि माधव सुर्यवंशी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात हजारो लातूरकरांनी सहभाग घेत ग्रामदैवताच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा अनुभवला. रामफळ आणि सीताफळ वृक्षांचे रोपण करुन  राम सीता वाटिका साकारण्यात आली होती. तसेच विजयकुमार धायगुडे, विक्रम कोतवाड, रवी किडीले, सिध्देश्वर भजन मंडळ यांच्यावतीने अतिशय सुंदर भजन संध्या सादर करण्यात आली. त्यानंतर ११ हजार दिवे प्रज्वलित करुन दीपोत्सवही साजरा करण्यात आला.
श्री सिध्देश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या उत्स्कृष्ठ आयोजनाबद्दल लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी श्री सिद्धेश्वर व रत्नेर्श्वर देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, विश्वस्त मंडळ, माजी नगराध्यक्ष तथा अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, सचिव अशोक भोसले, बाबासाहेब कोरे,  श्रीनिवास लाहोटी, मन्मथप्पा लोखंडे, सुरेश गोजमगुंडे, प्रदीप राठी, नरेशकुमार पंड्या, अरविंद सोनवणे,  रमेशसिंह बिसेन, चंद्रकांत परदेशी, व्यंकटेश हालिंगे, दत्ता सुरवसे, विशाल झांबरे, आयोजन समितीचे सर्व सदस्य, आणि भक्त परिवाराचे लातूरकरांच्या वतीने आभार व्यक्त्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR