23.4 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeलातूरचिंते यांचा अमृत महोत्सव सोहळा

चिंते यांचा अमृत महोत्सव सोहळा

लातूर : प्रतिनिधी
माजी वीज अभियंता व सामाजिक जाणीवा जपणारे महावितरणचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता निवृत्ती नरसिंगराव चिंते धवेलीकर यांनी वयाची पंच्याहत्तर वर्षे पुर्ण केली म्हणून त्यांचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
येथील विष्णुदास मंगल कार्यालय येथे १५ जुलै रोजी हा सोहळा पार पडला. प्रास्ताविक उदय चामले यांनी केले. प्रथम मान्यवरांचे स्वागत सत्कार मूर्तीची तुला व सत्कार करण्यात आला. श्री व सौ. चिंते यांचे उपस्थित झालेल्या मान्यवरांनी अभिष्टचिंतन करुन दीर्घायुष्याच्या मनोकामना केल्या. श्रीमान चिंते यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मुख्य अभियंता एस. डी. इनामदार यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी कैलास पारवे, गोविंद बेडदे, माजी मुख्य अभियंता हरिदास बंडे,  नित्यानंद मैया व प्रदीप सोनपेठकर उपस्थित होते.
के. एन. अंबाड यांनी चिंते यांच्या सहवासातील अग्रणी दैनिकांतून प्रकाशित केलेले स्­पष्­टोक्­तीचे भोक्­ते-निवृत्­तीरावचिंते हे अनुभव लेखी कथन प्रतिलिपीत उपस्थित मान्यवरांना सादर केले. या कार्यक्रमास माजी आमदार गोविंदराव केंद्रे, प्रा. मनोहरराव पटवारी, लक्ष्मणराव वंगे व रेड्डी, ख्यातनाम लेखक डॉ. व्यंकट कोलपूके, अशोकराव कासले उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR