नांदेड : प्रतिनिधी
शहरातील जय भीम नगर भागात एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी १४ मे रोजीच्या दुपारपर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार, गुन्हा दाखल करण्यात आला नाही .
शहरातील जयभीम नगर येथे प्रकाश खाडे वास्तव्यास होता. १३ मे रोजी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. पप्पू खाडे व प्रकाश खाडे या २ भावांमध्ये दारूच्या नशेत भांडण झाले असल्याचे समजते. त्यानंतर मृत प्रकाश खाडे दगडावर पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १४ मे रोजी च्या दुपारपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. मृत प्रकाश खाडे यांच्या अंत्यसंस्कारानंतर नातेवाईक पोलीस ठाण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
















