लातूर : प्रतिनिधी
शांत, सुरंक्षीत म्हणून ख्याती असलेल्या आणि शिक्षण, व्यापार औद्योगिक तसेच कृषी विकासाच केंद्र म्हणून सुप्रसीध्द झालेल्या लातूर जिल्ह्यात सध्या वाढत चाललेली गुन्हेगारी चिंताजनक असुन या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजना आखून ताबडतोब त्यावर कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आदेश् दयावेत, अशी मागणी करणारे निवेदन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन ब-याच आवधीनंतर शनिवारी जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या निमित्ताने लातूर जिल्हा दौ-यावर आले होते. बैठकीदरम्यान लातूर शहर व जिल्ह्यातील विकास योजना संदर्भात आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना अनेक निवेदणे सादर केले आहेत. यात लातूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदण दिले आहे. या निवेदनात आमदार देशमुख यांनी म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यात सामाजीक सलोखा राखून येथे कायम शांतता व सुरंक्षततेचे वातावरण निर्माण केले गेले आहे. त्यामुळे येथे शिक्षणाचा आदर्श पॅटर्न निर्माण होऊ शकला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात येथील सुरंक्षीत वातावरणामुळे त्यांच्या पालकांना कसलीही चिंता वाटत नाही. या सुरक्षीततेच्या वातावरणामुळे लातूर आता उदयोग, व्यापार आणि आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून परीचीत होत आहे.
मागच्या काही महिन्यापासून मात्र लातूर जिल्ह्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. खुन, चो-या हे प्रकार वाढत आहेत शस्त्रसाठा सापडत आहे. मंगळसुत्र चोरी महीलावर हल्ले हे प्रकार नित्याचे झाले आहेत. विद्यार्थ्यावर हल्ले होत आहेत. वसतीगृहातील विद्यार्थीनीवर अत्याचार होऊन खुन झाल्याचे प्रकरण घडले आहे. बंदी असलेल्या गुटख्याचे साठे सापडले आहेत हे प्रकार त्वारीत थांबणे आवयक आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेऊन लातूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्य सुचना द्याव्यात, अशी मागणी या निवेदनात आमदार देशमुख यांनी केली आहे.
लातूर एमआयडीसीमधील उद्योजकांना त्यांना हव्या असलेल्या प्रमाणात वीज मिळण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणे रोहित्र उपलब्ध करुन द्यावेत. लातूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा आराखडा तयार असून बांधकाम सुरु होण्यासाठी येत असलेल्या अडचणी त्वरित दूर कराव्यात. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारत बांधकाम व इतर सोयीसुविधांसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्याचे निवेदणे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिले आहेत. या बैठकीदरम्यान केलेल्या या मागण्याची नोंद घेऊन त्याची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान दिली आहे.