22.1 C
Latur
Friday, September 5, 2025
Homeक्रीडाज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

लातूर : प्रतिनिधी
क्रीडा क्षेत्रात देशाचे अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी पुरूषोत्तम रूकमे यांनी केले. भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त ज्ञानेश्वर विद्यालय लातूर येथे ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.एम. मलवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून सायकलिस्ट क्लब, लातूर अध्यक्ष तथा माजी नायब तहसिलदार श्रावण उगले तर विकास कातपूरे, सतीश खोबरे, श्रीरंग मद्रेवार, गंगाधर सोमवंशी, विष्णू मदने, मुत्रा टेंकाळे, गणेश हाके, अमृत मेळकुंदे, प्रताप बिसेन, शाम शेटे, उपप्राचार्य माधवराव क्षीरसागर, ज्येष्ठ पत्रकार शिरीषकुमार शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुरूषोत्तम रूकमे यांनी दक्षिण आफ्रिका येथील ९८ वी कॉम्रेडस् मॅरेथॉनचे ९० किमी अंतर कशा प्रकारे पार पाडले व स्पर्धेत यश मिळवले हे सविस्तर सांगितले. तसेच श्रावण उगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य एस. एम .मलवाडे यांनी संघभावना वाढीस लावण्यास खेळ मदत करतात असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य माधवराव क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गोविंद शेळके व हरीश कुलकर्णी यांच्या संगीत मंचने स्वागत गीताने केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ खंदाडे तर आभार समाधान बुरगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख माया अनिगुंटे, सोपान रूकमे, समाधान बुरगे, शिवाजी पांचाळ, बालाजी फड, ज्ञानेश्वर बेंबडे, भागीरथी गुणाले यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR