26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयझटक्यात २६ हजार फूट खाली आले बोईंग विमान!

झटक्यात २६ हजार फूट खाली आले बोईंग विमान!

शांघाय : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यात विमानात बिघाड होऊन अपघात झाल्याच्या घटना समोर येत असतानाच आता जपानमधून देखील एक अशीच घटना समोर आली आहे. जपान एअरलाइन्सच्या शांघायहून टोकियोला जाणा-या विमानात प्रवाशांनी भीतीदायक अनुभव घेतला. हे विमान अचानक २६,००० फूट खाली उतरल्यामुळे प्रवाशांना ऑक्सिजन मास्क वापरावे लागले.

३० जून रोजी हे विमान चीनमधील शांघाय पुडोंग विमानतळावरून जपानच्या टोकियो नरिता विमानतळासाठी निघाले होते. हे विमान जपान एअरलाइन्स आणि त्यांची लो-कॉस्ट कंपनी स्प्रिंग जपान यांच्या कोडशेअर अंतर्गत चालवले जात होते. विमानात एकूण १९१ प्रवासी होते.

उड्डाणानंतर विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि ते अवघ्या १० मिनिटांत ३६,००० फूटांवरून सुमारे १०,५०० फूटांपर्यंत खाली आले. ही घटना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६:५३ वाजता घडली. या प्रकरणी प्रत्येक प्रवाशाला १५,००० येन (अंदाजे ७,००० रुपये) प्रवास भरपाई म्हणून देण्यात आली आणि एक रात्रीचे निवासही पुरवण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

प्रवाशांचा जीव मुठीत!
विमानात अचानक दाब कमी झाल्यामुळे ऑक्सिजन मास्क खाली आले. काही प्रवाशांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. एका प्रवाशाने सांगितलं, ‘एक आवाज आला आणि काही सेकंदातच ऑक्सिजन मास्क खाली आले. एअर होस्टेस रडत ओरडत होती की मास्क घाला, विमानात बिघाड झाला आहे.’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR