धाराशिव : प्रतिनिधी
घरासमोरील ओट्यावर झोपलेल्या एका २३ वर्षीय तरूणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे शुक्रवारी दि. २४ मे रोजी मध्यरात्री घडली आहे. संदेश भाऊसाहेब पाटील (वय २३) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात शनिवारी दि. २५ मे रोजी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपीमध्ये खून झालेल्या तरूणाचा बाप व मोठा भाऊ आहे. नवीन चारचाकी गाडी खरेदीच्या कारणावरून मयत संदेश पाटील हा वडील व भावाला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळलेल्या बाप-लेकाने खून केला असून या दोघांनीही खुनाची कबुली दिली असल्याचे पोलीसांनी सांगितले.
करजखेडा ता. धाराशिव येथील मयत संदेश भाऊसाहेब पाटील (वय २३) वर्षे हा दि. २४ मे रोजी रात्री करजखेडा येथे त्याच्या राहत्या घरासमोर ओट्यावर झोपला होता. त्यावेळी अज्ञात मारेक-यांनी त्याच्या डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाणे येथे दि. २५ मे रोजी भा.दं. वि. सं. कलम- ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोहेकॉ अमोल निंबाळकर, पोहेकॉ विनोद जानराव, सय्यद हुसेन, जावेद काझी, पोना नितीन जाधवर, पोना बबन जाधवर, मपोहा शैला टेळे, चालक पोहेकॉ संतोष लाटे, पोहेकॉ विजय घुगे, चालक पोकॉ प्रशांत किवंडे यांचा समावेश असलेले पथक खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रवाना झाले.
या तपास पथकास गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, खून झालेला तरूण संदेश भाऊसाहेब पाटील हा घरात नेहमी वडील व भावासोबत जमीणीचे वाटणीचे कारणावरुन व नवीन चारचाकी कार खरेदीचे कारणावरुन भांडण, तक्रारी, शिवीगाळ करत होता. त्याच्या नेहमीच्या या कारणामुळे वडील व भाऊ वैतागले होते. त्याचाच राग मनात धरुन वडील भाऊसाहेब गोविंदराव पाटील व भाऊ प्रितम भाऊसाहेब पाटील या दोघांनी संगणमत करुन दि. २४ मे रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास संदेश भाऊसाहेब पाटील हा घरासमोरील ओट्या झोपला असताना त्यास झोपेतच डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळल्यावरुन पथकाने आरोपी वडील भाऊसाहेब गोविंदराव पाटील, भाऊ प्रितम भाऊसाहेब पाटील रा. करजखेडा या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सदर गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता सदरचा गुन्हा आम्हीच केला आहे, अशी कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी बेंबळी पोलीस स्टेशन येथे हजर केले.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ अमोल निंबाळकर, विनोद जानराव, सय्यद हुसेन, जावेद काझी, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोहा शैला टेळे, चालक पाहेकॉ संतोष लाटे, घुगे, चापोकॉ किवंडे यांच्या पथकाने केली आहे.