नांदेड : प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथे एका लग्न समारंभात लावण्यात आलेल्या डीजेच्या आवाजावरून २ गटात तुंबळ हाणामारी झाली. यात तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटातील १८ जणांवर कुंटूर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी गुन्हे दाखल केले आहेत.
नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथे रविवारी दुपारी एक विवाह समारंभ होता. यासाठी रात्री १० वाजता डीजेचा आवाज जोरात करून काही जण नाचत असताना आवाजावरून २ गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात तीघे जखमी झाले. या प्ररिणी दोन्हीही गटातील प्रत्येकी ९ अशा एकूण १८ जणांवर कुटूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
















