डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी पाचवी अटक

मुंबई : प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे चालवण्यात येणा-या शास्त्रीनगर रुग्णालयात ६ जुलै रोजी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, आता या प्रकरणात सीसीटीव्हीत दिसणा-या महिला आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणाला नवे वळण आले आहे. उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींचा जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली आहे. पाचवी आरोपी साधना कारंडे या उपचार घेत असलेल्या प्रियांका उधमाळेची आई आहेत. यांना पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे.

मारहाणीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधना कारंडे दिसत असल्याने तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी तिला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अटकेची कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी तिला राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.
प्रियांकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर साधना कारंडे हिला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात हायकोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे तपासाला वेग आला असून आरोपींवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द
मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी पालिकेच्या रुग्णालयातील तीन डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दिलेला जामीन रद्द केला. कल्याण येथील दंडाधिकारी न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन मंजूर करण्याच्या दिलेल्या आदेशाची उच्च न्यायालयाने आज स्वत:हून दखल घेतली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news