जालना : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. त्यांच्यावर भाजप नेते प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. ‘दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर सखूसारखा दिसेल अशी वैयक्तिक टीका जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर केली आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले होते. त्यावर भाजप नेते प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. आता मात्र जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले असून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.
जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना समोर करून काड्या करत आहेत. दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर, अतिशय सुंदर दिसेल, सखूसारखा दिसेल अशी पातळी सोडून वैयक्तिक टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारकडून कोणी आले नाही, कारण सरकारकडे मंत्री उरले नाहीत. अनेक जण आले, आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचे हा विषय असेल. समाजाच्या दबावामुळे मी सलाईन घेतले, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.