18.3 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeलातूरदीपोत्सवात घ्या वीजसुरक्षेची काळजी

दीपोत्सवात घ्या वीजसुरक्षेची काळजी

लातूर : प्रतिनिधी
दीपावली हा आनंदाचा व उत्सहाचा सण. या सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी मोठयाप्रमाणावर होते. मात्र, याप्रसंगी वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वीज यंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी सण साजरा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
महावितरणच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिट जवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीज वाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीज यंत्रणेला आग लागल्यास, घोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरु असणा-या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचबरोबर नजकिच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.
गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंध असावी. तुटलेली किंवा सेलो टेपने जोडलेली नाही याची खात्री करुन घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR