मुखेड : प्रतिनिधी
शहरातील वासुदेव गल्लीतील रहिवासी असलेले दोन युवक दुचाकीवर येत असताना सावरगावपीर जवळ दुचकीचे अपघात होवून यातील १ युवक जागीच ठार झाला तर १ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा घडली.
अहमदपूर जि. लातूरहून नातलगाचे अंत्यसंस्कार करून मुखेडकडे दोघे जण परत येत होते. वासुदेव गल्लीतील रहिवासी नागेश कुमार कुंभारकर वय ४० व माधव धुमाळ वय ३० हे एम एच २२ ए आर ८७४५ या दुचाकीने येत असताना सावरगाव पीर जवळ त्यांच्या वाहणास अपघात झाला. यात नागेश कुमार कुंभारकर याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर माधव धुमाळ किरकोळ जखमी झाले.
अपघात नेमका कसा झाला याबाबत अधीक माहिती मिळाली नाही. रात्री पर्यत मुखेड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. दरम्यान तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात जवळपास १० ते ११ अपघात झाले असून ८ ते ९ जन मोटारसायकल अपघातांत जीव गमावला आहे. अपघाताची मालिकाने नागरिक भयभीत झाले आहेत. कुंभारकर यांचे अपघातात दुदैर्वी मृत्यु झाल्यामुळे मुखेड व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.