लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था
‘एआय’ सारखे तंत्रज्ञान नवीन आहेच परंतु ते अनपेक्षित कामही करते. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे नुकतीच एक घटना समोर आली आहे. ज्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका महिलेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञान देवासारखे धावून आले.
अमेरिकेत राहणा-या एका महिलेने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तिच्यावरील भरभक्कम कर्जाची रक्कम निम्म्यापेक्षा कमी केली आहे. ३५ वर्षीय जेनिफर एलन हिने या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिताफीने वापर केला त्यामुळे तिने २३ हजार डॉलरचं क्रेडिट कार्डचं निम्म कर्ज फेडण्यास यशस्वी झाली. भारतीय चलनात ही रक्कम २० लाखांपर्यंत होते.
एलन ही रिअल इस्टेट एजेंट आणि कन्टेंट क्रिएटर आहे. तिने नुकतेच क्रेडिट कार्डचे २३ हजार डॉलर कर्ज फेडले आहे. उँं३ॠढळ च्या मदतीने तिने सहजपणे हे कर्ज फेडले. जेनिफरने याबाबत माहिती देताना सांगितले की, माझे उत्पन्न ठिकठाक होते परंतु कधीही मासिक बजेट कसे ठेवायचे, पैशाचे नियोजन कसे असावे हे माहिती नव्हते. मुलीच्या जन्मापर्यंत सुरळीत सुरू होते परंतु त्यानंतर परिस्थिती बिघडली. मेडिकल खर्च, मुलीचा देखभाल यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करावा लागत होता. त्यामुळे हळूहळू मी त्या कर्जाच्या जाळ्यात अडकत गेले असे तिने सांगितले.