29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रदेशाच्या तिजोरीवर मोठा बोजा; काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर

देशाच्या तिजोरीवर मोठा बोजा; काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर

पुणे : प्रतिनिधी
पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. यावरून आता विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द झाला आहे. यानिमित्ताने त्यांच्या हस्ते जी उद्घाटनं होती ती रद्द झाली आहेत. पंतप्रधान मोदी पुण्यातील टप्प्या-टप्प्याच्या मेट्रोच्या उद्घाटनासाठी येतात. यामुळे राज्याच्या, देशाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडतो. याची कल्पना देखील या नेत्याला येत नाही, असे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

करोडो रुपयांचा चुराडा या दौ-यानिमित्ताने होणार होता आणि तो झाला आहे. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून देखील उद्घाटनं केली आहेत. त्यांनी त्याच पद्धतीने ही उद्घाटनं केली असती तर लाखो रुपये वाचले असते. पण, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उद्घाटनाचा घाट घातला गेला. पुण्यासाठी काहीतरी करतोय असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता, असे धंगेकर म्हणाले आहेत.

राजकारण बाजूला ठेवून पुणे मेट्रोचे उद्घाटन करायला हवे. आता पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्याकिंवा मान्यवरांच्या हातून उद्घाटन करून हा भुयारी मार्ग सुरु करण्यात यावा. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्ग प्रवाशांसाठी आज सुरु करण्यात यावा. यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यात येऊ नये. अशी आमची नरेंद्र मोदी आणि प्रशासनाला विनंती आहे, असं ते म्हणाले.

जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी आहे. जनतेचा पैसा वाया घालवू नये, टप्प्याची उद्घाटनं काही महत्त्वाची नाहीत. राज्यातील इतर नेत्याने, पालकमंर्त्याने उद्घाटन केले असते तरी चालले असते. पण, विनाकारण पैसे खर्च केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात येत आहेत. एक पुणेकर म्हणून हा खर्च टाळावा असं धंगेकर म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR