22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रनव्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव

नव्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव

कोल्हापूर : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. ‘जीएन १’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. अशात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट सौम्य आहे. मात्र तरीही यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

नव्या व्हेरिएंटच्या दृष्टीने तयारी याआधीच झाली आहे. केरळमध्ये जे तीन मृत्यू झाले, त्यात ‘जीएन १’ पॉझिटिव्ह रुग्ण नव्हते. काल टास्क फोर्सची याबाबत बैठक झाली. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील. त्यांच्यासोबत काल माझी बैठक झाली आहे, असे तानाजी सावंत म्हणाले.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. ‘जीएन १’ या कोरोना व्हेरिएंटचा एक रुग्ण सिंधुदुर्गमध्ये आढळला. त्यानंतर यंत्रणा अलर्टवर आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला आवाहन केले आहे. येत्या काळात गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या. नागरिकांनी काळजी घेऊन गर्दीच्या कार्यक्रमाला जायला हवे. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतले आहे, असे सावंत म्हणाले.

यंत्रणा सज्ज : सावंत
कोणत्याही सरकारी दवाखान्यात साहित्य धूळ खात पडून नाही याची खात्री आम्ही केली आहे. पुन्हा कोरोनाचे संकट आले तर यंत्रणा सज्ज आहे, असेही सावंत म्हणाले. कोल्हापूरमध्ये कोविड काळात झालेल्या साहित्य खरेदी घोटाळ्याची मी पूर्ण माहिती घेतली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कोणी दोषी आढळले तर करावाई नक्की होणार आहे, असेही तानाजी सावंत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR