नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! ५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मंजुरी

नांदेड : राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणा-या प्रगती प्रकल्पाअंतर्गत नांदेड येथे आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अर्थसाहाय्यातून ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे यांनी मागील दोन वर्षांपासून या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, नागरिकांना स्थानिक पातळीवर दजेर्दार व मोफत उपचार उपलब्ध करून देणे, हा या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीचा मुख्य उद्देश आहे. या रुग्णालयाच्या प्रभावी संचालनासाठी मंजूर आकृतीबंधानुसार सर्व ५९४ पदे नव्याने निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या नवनिर्मित पदांच्या वेतनासाठी ३१.२५ कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च मंजूर करण्यात आला आहे.

याच शासन निर्णयान्वये राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकायार्ने ४ हजार २५० कोटी रुपये खचार्चा प्रगती प्रकल्प राबविला जाणार असून, यामध्ये ७० टक्के एडीबी चे कर्ज आणि ३० टक्के राज्य शासनाचे योगदान असणार आहे. या निधीपैकी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी प्रकल्पाअंतर्गत मंजूर आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा आणि सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे.

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते ५०० खाटांचे करण्याचा शासन निर्णय यापूर्वीच जारी झाला होता. या प्रकल्पासाठी निधीही उपलब्ध करून द्यावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पाटीर्ने प्रसिद्ध केलेल्या विकसित नांदेडचा संकल्पनामा या घोषणापत्रातही या रुग्णालयाच्या उभारणीचे आश्वासन देण्यात आले होते.

दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण यांनी १७ मार्च २०२६ रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून ५०० खाटांच्या नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयाला आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती. त्या लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी एडीबी अंतर्गत कामांच्या पुढील प्रस्तावात या रुग्णालयाच्या उभारणीचा समावेश केला जाईल, असे जाहीर केले होते. नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निर्णयाबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांचे आभार मानले आहेत. ही मान्यता मिळवण्यासाठी भाजपा-महायुतीतील सहकाऱ्यांचे मोठे योगदान लाभल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

पाठपुराव्यास यश मिळाले : आ. बोंढारकर
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्रगती प्रकल्पां तर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून नांदेड येथे ५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे, अशी प्रतिक्रिया आ. आनंद बोंढारकर यांनी दिली.

या रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या ५९४ पदांच्या आकृतीबंधालाही मान्यता देण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे ५०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. नांदेडच्या नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि दजेर्दार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे आ. बोंढारकर यांनी सांगीतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12
Video thumbnail
माहूरजवळ भीषण अपघात | एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी | Nanded News Today
02:03
Video thumbnail
Latur|समान वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रम;कवेतनातील तफावत कधी मिटणार?
06:30
Video thumbnail
Nanded Sand Mafia Action | आठ बोटी ब्लास्ट करून नष्ट | LCB Raid | Nanded News
00:48
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये १४.४८ लाखांचा गुटखा जप्त | बोलेरोसह मुद्देमाल ताब्यात | Latur News
01:42
Video thumbnail
'गोविंदा' अन् 'उदो उदो'च्या जयघोषात अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
00:56
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10

Latest news