29.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये वाजला महायुतीच्या प्रचाराचा बिगुल!

नाशिकमध्ये वाजला महायुतीच्या प्रचाराचा बिगुल!

नाशिक : प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्याचे लोकार्पण नाशिकमध्ये झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने या दोन्ही अर्ध पुतळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमानिमित्त येणा-या विधानसभा लक्षात घेता नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचाराचा बिगुल वाजला आहे.

दरम्यान, नाशिक शहरातील मुंबई नाका येथील महिला रुग्णालयाच्या दुस-या टप्प्याचे भूमिपूजन, इंदिरानगर येथील अंडरपासचे रुंदीकरण आणि हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाचे नूतनीकरण अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत झालेल्या कार्यक्रमातून महायुतीने शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला, असा संदेश देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शरसंधान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसह विविध मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी मराठा आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे भूमिपूजन, बाळासाहेब ठाकरे स्मृति उद्यानाचे उद्घाटन, नाशिक पश्चिम मतदारसंघात रस्त्याचे काँक्रिटीकरण हे महत्त्वाचे प्रकल्प होते. एकंदरच स्थानिक आमदारांनी यानिमित्ताने आपण विकासाचे किती काम करतो, असे मतदारांपर्यंत पोहोचविले. मुख्य म्हणजे या निमित्ताने महायुतीचे तिन्ही नेते आणि या पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले होते.

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आणि मतदारांमध्ये राजकीय संदेश देण्यात ते यशस्वी ठरले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, असा संदेश यातून कार्यकर्त्यांना मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR