पुणे : प्रतिनिधी
कल्याणीनगरमध्ये दोन दुचाकीस्वारांना अलिशान गाडीखाली चिरडणा-या अल्वपयीन मुलाचे वडिल बांधकाम व्यावसायिक अगरवाल यांना पुणे पोलिसांनी आज (बुधवारी) पहाटे संभाजीनगर मधून अटक केली आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघात प्रकरणात, अल्पवयीन मुलगा मद्यपान करतो हे माहिती असूनही, त्याला कार दिल्याने पुणे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केला होता.
मात्र, गुन्हा दाखल होताच अल्पवयीन मुलाचे वडिल फरार झाले होते. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्पवयीने मुलाने ज्या कारने अपघात केला होता, ती कार विना नोंदनी असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामिन मिळाला आहे. आरोपीचा जामिन रद्द व्हावा यासाठी पुणे पोलीस सत्र न्यायालयात जाणार आहेत.