नगर :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. नौदलाकडून पुतळ्यासंदर्भामध्ये निकष पडताळून पाहण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यांना नौदलावरच विश्वास आहे की नाही हा प्रश्न आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे
.
सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी घटनास्थळी जात पाहणी केली होती. दरम्यान, आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी भाजप नेते नारायण राणे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला. आता याबाबत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मात्र त्याबाबत केलं जाणार राजकारण हे उचित नसल्याचे देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मविआकडून सरकारचा निषेध केला जातोय याबाबत महसुलमंत्री राधाकृष्ण विखेंना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.