लातूर : बंदुकीतून गोळी झाडून खून केल्याच्या आरोप प्रकरणात लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट क्र. ३ लातूर यांनी आरोपी मुलास जनमठेपेची शिक्षा ठोठावली आहे तर त्याचे वडीलास निर्दोष मुक्त केले आहे. लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ सप्टेबर २०१९ मध्ये एकाचा बंदुकीतून गोळी झाडून प्रकाश नगर येथे खून केल्या प्रकरणात फिर्यादी विकास उर्फ विक्की युवराज मलाडे रा. प्रकाश नगर यांचा भाऊ राहुल मलाडे यास आरोपीतांनी स्वत:च्या घरी बोलावून घेऊन परवाना असलेल्या बंदुकीने गोळी मारून खून केला होता. मा. न्यायालयाने या प्रकरणात अमोल उर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड यास जन्मठेप व १०,००० रूपये दंड, आर्म अॅक्ट कलमान्वये २ वर्ष शिक्षा ठोठावली आहे तर अण्णासाहेब सदाशिवराव गायकवाड यांना निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता व्ही. व्ही. देशपांडे यांनी सरकारची बाजू मांडली. या प्रकरणात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक यांनी तपास केला तर जमादार हिंगडे यांनी पैरवी केली.