लातूर : प्रतिनिधी
अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभागात झालेले रस्ते भुयारी गटारी करण्यासाठी लातूर मनपाने मधोमध खोदले आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे प्रभागातील प्रत्येक रस्त्यावर चिखल होत आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने खोदलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करुन उर्वरित कामे पावसाळ्यानंतर करावे अशा आशयाचे निवेदन लातूर शहर महानगरपालिका आयुक्त्तांना दिले आहे.
लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील एलआयसी कॉलनी, बलदवानगर, देशमुखनगर, रुद्रेश्वरनगर, विद्यानगर, संत ज्ञानेश्वर नगर या भागातील महानगरपालिकेने भुयारी गटारी व गॅस पाईपलाईन करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम केले आहे. संपूर्ण रस्त्यावर माती व दगड पसरले आहेत, यातच पाऊस पडल्यामुळे प्रभागातील या भागातील रस्त्यावर झाला आहे. घराबाहेर निघणे देखील अडचणीचे झाले आहे. पावसाळा सुरु झाल्याने नागरिकांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे.
यासार्व कारणामुळे लातूर शहर महानगरपालिकेने प्रभागात चालू असलेले काम तात्काळ थांबून रस्ता दुरुस्त करुन द्यावा अशी मागणी आयुक्त्त यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. यासोबतच रस्ता तातडीने दुरुस्ती न केल्यास निवेदनात दिला आहे. निवेदनावर बाबासाहेब खुणे, सचिन सुरवसे, दत्तू अचूळे, लक्ष्मीबाई स्वामी, हिरकणा टिके, किशोर पवार, सिध्देश्वर धुमाळ, प्रवीण मताई, प्रा. शिवनगे, प्रदीप लांजजिले, सिद्राम देवकते, अनंत कुलकर्णी, चंद्रशेखर करपे, बालाजी जोशी, अरविंद धुमाळ, उमाकांत बिराजदार, बाळासाहेब जाधव, विजयकुमार कनसेट्टी, संजय पवार, संजय पांडे, शिवलिंग पाटील आदींची नावे आहेत.