27.9 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंची अनुपस्थिती

फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंची अनुपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिस-यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच महाराष्ट्रातील सर्व पक्षप्रमुखांमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात आले आहे. मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नसल्याचे समजते.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फोन करून निमंत्रित केले होते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यसभेचे सदस्य असणारे शरद पवार हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला येऊ शकणार नसल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांना वैयक्तिक करणास्तव या सोहळ्याला जाणे शक्य नसल्याची माहिती आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR