22.8 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeराष्ट्रीयबस दरीत कोसळून ४ ठार

बस दरीत कोसळून ४ ठार

मध्य प्रदेशच्या खरगोनमधील घटना २१ प्रवासी जखमी; जेसीबीच्या साहाय्याने अडकलेल्यांची सुटका

खरगोन : खरगोन जिल्ह्यात शनिवारी एका प्रवासी बसचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. या अपघातात तीन महिला आणि एका बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले आहेत. खरगोन जिल्हा मुख्यालयापासून ४२ किमी अंतरावर असलेल्या बरवानी जिल्ह्यातील जिरतपुरा गेटवर हा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.१० वाजता बस खरगोनहून अलीराजपूरसाठी निघाली होती. त्यात २५ ते ३० प्रवासी होते. यादरम्यान जीरतपुरा गेटजवळ बसचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत पलटी झाली. माहिती मिळताच सेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. काही वेळाने तहसीलदारही घटनास्थळी पोहोचले.

दरीत कोसळलेली बस २ जेसीबीच्या साहाय्याने सरळ करून खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने सेगावच्या रुग्णालयात आणण्यात आले. येथून ११ गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएसपी मनोहरसिंग बारियाही घटनास्थळी पोहोचले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR