20.2 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeलातूरभाजप सरकारचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ

भाजप सरकारचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची संस्कृती ही पुरोगामी विचारांची आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा फुले आदी महापुरुषांच्या विचारांनी चालणारा आहे; परंतु केंद्र सरकारने महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले. पक्ष फोडले, घरे फोडली. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करीत असल्याची टीका लातूर ग्रामीणचे आमदार तथा महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
औसा तालुक्यातील वानवडा, सिंदाळा, मनोहर तांडा, सिंदाळा, टाका, बिरवली, शिवली, जायफळ, अंदोरा, वडजी आदी गावांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी लातूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, मारूती महाराज कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, लातूर जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संचालक सदाशिव कदम, महेंद्र भादेकर, शिवसेना तालुका अध्यक्ष सतीश शिंदे, उदयसिंह देशमुख, बालाजी बिराजदार, रघुनाथ शिंदे, शिवप्रसाद श्.िांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार धिरज देशमुख म्हणाले, भाजपचे विचार हे महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाने योग्य वेळी जाणले. त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली. महाविकास आघाडीने सत्तेत येताच सर्वात आधी शेतक-यांची कर्जमाफी केली. नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले. काँग्रेस पक्षाने अन्नसुरक्षा कायदा केला, शिक्षण कायदा केला.ज्यांनी सोयाबीनला ६ हजार भाव मिळावा यासाठी दिंडी काढली. आज त्यांचे खासदार- आमदार सत्तेत आहेत. आता ही मंडळी सोयाबीनच्या दराबद्दल का बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याला केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरण जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. एकट्या मांजरा परिवाराने ४००० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. लातूरच्या रेल्वे कोच कारखान्यामध्ये मतदारसंघातील एका तरी बेरोजगारास काम मिळाले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.
या वेळी प्रताप कदम, अमित पाटील, गुणवंत कदम, पंढरीनाथ गरड, सुखलाल गरड, माणिक पाटील, सयाजी पाटील, शिवाजी कदम, आत्माराम गरड, नितीन गरड, दत्तू गोटे, उमाकांत पाटील, प्रसाद हिप्परकर, संदिपान शेळके, धनु महाराज रेंगणे, रवी पाटील, अतुल शिंदे, विनोद गोरे, विलास पाटील, राजेंद्र गोरे, बब्रुवान बंडगर, अंगद शिंदे, कुलदिप शिंदे, जगदीश शिंदे, वामन मोरे, धनराज मोरे, शेषेराव चव्हाण, मुरलीधर गरड, वामन गरड, दयानंद सरतापे, श्रीपतराव काकडे, राजेंद्र पाटील, परमेश्वर लांडगे, शहाजी पाटील, रामदास सूर्यवंशी, शाम सूर्यवंशी, सुहास काळे, खंडू सूर्यवंशी, सचिन शिंदे,  परमेश्वर लांडगे, अनंत दोडके, राजेंद्र पाटील, वामनराव घोडके, बळवंत पाटील, नवनाथ घोडके आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR