सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे कार्याध्यक्षा, आ. प्रणिती शिंदे ह्या मोहोळ तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी गाव भेट दौरा आयोजित केला असून यात हराळवाडी, कोरवली, जामगाव बु/खुर्द, वटवटे, येणकी, मिरी, अरबळी, घोडेश्वर बेगमपुर, अर्धनारी, इंचगाव, सोहाळे, वाघोलीवाडी, कामती, लमाणतांडा या गावांना भेट देऊन नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात सत्ताधारी भाजपने जनतेची भ्रमनिराशा केली असून महागाई, बेरोजगारी, शेतमालाला हमी भाव नाही, वाड्या वस्तीवर राहणाऱ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही, पाण्याचे नियोजन नाही, निराधारांचे प्रकरणे होत नाहीत त्यांना उत्पन्न दाखला मिळत नाही, मोहोळ तालुक्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष नाही, सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न संसदेत मांडणारा कोणीही नाही. जनतेने मोठ्या अपेक्षेने दोन वेळा भाजपचा खासदार निवडून दिले पण त्यांनी जनतेची निराशा केली म्हणून जनतेचे प्रश्न, अडचणी जाणून घेण्यासाठी, सोडविण्यासाठी, वस्तुस्थिती
मांडण्यासाठी मी मोहोळ तालुक्याचा गावभेट दौरा सुरू केला आहे. मी काम केले म्हणून माझ्या मतदारसंघातील जनतेने तीन वेळा मला निवडून दिले मोहोळ तालुक्यातील जनतेनेही माझ्यावर विश्वास ठेवावा मी तुमच्या अडचणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी, आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाला साथ द्या.
या गावभेट दौऱ्यामध्ये तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, राजेश पवार, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, किशोर पवार, मयूर खरात, राजशेखर पाटील, अजित जगताप, ज्ञानेश्वर पाटील, वैभव कुचेकर, योगेश शिंदे, बाळासाहेब डूबे पाटील, गौतम खरात, भीमराव वसेकर, आरिफ पठाण, पवनकुमार गायकवाड, अशोक भोसले, अर्जुन डांगे, तिरुपती परकीपंडला, दत्ता चव्हाण, रफिक पाटील, बालाजी लोकरे, महेश जाधव, मनोज धडके, वैभव सलगरे, आकाश राठोड, साधू पाटील, मौला अत्तार, बाबासाहेब पवार, सिद्धेश्वर व्हराडे, दत्ता सावंत, अप्पासाहेब पाटील, विजयकुमार पवार, विद्या कोळकुर, कुबेर गायकवाड, विद्या कोरके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.