नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. अनुष्का शर्मा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. सध्या अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतो आहे.
दरम्यान, न्यूयॉर्कच्या क्रिकेट स्टेडियमवर टी २० वर्ल्ड कपचा भारत-पाकिस्तानचा सामना झाला. हा सामना नक्कीच रोमांचक झाला. शेवटपर्यंत भारतीयांमध्ये धाकधूक बघायला मिळाली. शेवटी पाकिस्तानला धूळ चारत भारताने हा सामना जिंकला.
अनुष्का शर्मा ही विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी पोहचली होती. आता सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराटच्या चाहत्यांना अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. भारताने हा सामना जिंकल्यानंतरचा अनुष्का शर्मा हिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहे. अनुष्का शर्मा टाळ्या वाजून आनंद व्यक्त करताना दिसली. अनुष्का शर्मा हिचा हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला असून व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.