23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरभुकेच्या वेळा ओळखून फक्त दोनच वेळा जेवण करा

भुकेच्या वेळा ओळखून फक्त दोनच वेळा जेवण करा

अहमदपूर : प्रतिनिधी
माणसाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर कडक भुकेच्या वेळा ओळखून दिवसात फक्त दोन वेळाच जेवण करा त्यामुळे आपले बरेचसे आजार नियंत्रित होतात. खास करून मधुमेह व लठ्ठपणा यावर आपणास निश्चीतपणे मात करता येते, असे प्रतिपादन जीवनशैली मार्गदर्शक, आहार तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. अहमदपूर येथील विमलाबाई देशमुख शाळेत आयोजित व्याख्यानात ते बोलताना होते.
    आय एम ए, एम.पी.ए.आणि भाऊ  हॉस्पिटल अहमदपूर यांचाा वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होाते.  आजकाल मधुमेहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून भारतात ११  टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. १५  टक्के लोक मधुमेहाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अगदी सोप्या उपचार पद्धती,आहार पद्धती व व्यायाम यामुळे मधुमेह नियंत्रित करता येते असेही ते  म्हणाले. मधुमेह हा कमी होणारा आजार असून त्यासाठी नियंत्रित जीवनशैली यामध्ये कमी वेळा जेवण म्हणजे दिवसातून फक्त दोनच वेळा जेवण करणे आवश्यक आहे.  किमान शहरी भागातील लोकांनी ४५ मिनिटे व्यायाम केलाच पाहिजे असे ते म्हणाले.जेवण करते वेळेस फक्त ५५ मिनिटांमध्ये आपले जेवण संपवले पाहिजे, दोन जेवणामध्ये किमान आठ ते दहा तासाचे अंतर ठेवा व कर्बयुक्त पदार्थ कमी खावेत साखर हे विष आहे ते कमी खावे.  दररोज चार ते पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम करावाकिंवा बारा किलोमीटर सायकंिलगकिंवा ४५ सूर्यनमस्कार घालावेत असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत उगिले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मधुसूदन चेरेकर, अ‍ॅड.पी.डी. कदम, भुषणकुमार जोरगुलवार ,विमलाबाई देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कोयले व राजपंगे या मंचावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पल्लवी कदम- बुजरुग यांनी तर सूत्रसंचालन अनिल चवळे यांनी केले व  आभार डॉ. गणेशराव कदम यांनी मानले.   या व्याख्यानास शहरातील नागरिक, पत्रकार बांधव, डॉक्टर मंडळी, व महिला भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आगलावे, अ‍ॅड. भगत, बालाजी नाईक, राजेसाहेब कदम, भाऊ हॉस्पिटलचे कर्मचारी, आय. एम.ए चे पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR