27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयभोपाळमध्ये सीबीआयच्या अधिका-यांना केली अटक

भोपाळमध्ये सीबीआयच्या अधिका-यांना केली अटक

लाचखोर प्रकरणी सीबीआयचीच कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत सीबीआय पथकाकडून सीबीआयच्या अधिका-यांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातील नर्सिंग घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्लीतील पथकाने भोपाळ सीबीआयच्या ४ अधिका-यांना अटक केली. याशिवाय लाच देणा-या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यक्षालाही अटक करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन सीबीआय मध्य प्रदेशातील नर्सिंग घोटाळ््याचा कसून तपास करत आहे. या प्रकरणी १९ मे रोजी रविवारी दिल्लीतील सीबीआय अधिका-यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिका-यांकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली भोपाळच्या चार सीबीआय अधिका-यांना अटक केली आहे. सीबीआय पथकाकडूनच सीबीआय अधिका-यांना अटक करण्यात आल्यामुळे संपूर्ण देशभरात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. तसेच सीबीआयकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर मध्य प्रदेशातील नर्सिंग घोटाळ््याला वेगळे वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवारी रात्री भोपाळ येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २९ मेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

सीबीआय इन्स्पेक्टरसह इतरांचा समावेश
सीबीआय पथकाकडून अटक करण्यात आलेल्या सीबीआय अधिका-यांमध्ये एक सीबीआय इन्स्पेक्टर आहे, तर इतर दोन एमपी पोलिस अधिकारी आहेत जे सध्या प्रतिनियुक्तीवर सीबीआयची सेवा करत आहेत. याशिवाय एका खासगी नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष, प्राचार्य आणि मध्यस्थ यांनाही लाच दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR