27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र‘मनसे’ असंतुष्टांसाठी पर्याय ठरण्याची चिन्हे!

‘मनसे’ असंतुष्टांसाठी पर्याय ठरण्याची चिन्हे!

मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यात यंदा महाविकास आघाडी विरोधात महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यातच मनसेकडूनही २०० ते २५० जागा लढण्याची तयारी करण्यात येत आहे.
राज ठाकरे महाराष्ट्र दौ-यावर निघाले आहेत. राज्यातील विविध भागात जात ते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तिथल्या लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र यातच राज ठाकरे शरद पवारांचा जुना आवडता डाव यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खेळण्याची शक्यता जवळपास स्पष्ट झाली आहे.
२०१९ च्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण बदलले. एकेकाळी राज्यात ३-४ पक्ष एकमेकांच्या विरोधात असायचे त्यामुळे ब-याच इच्छुकांना अनेक पर्याय उपलब्ध असायचे. इच्छुक उमेदवारही अनेक पक्षांचा शोध घ्यायचे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती हे दोनच पर्याय समोर आले.
यंदा सत्तेत कुठल्याही प्रकारे आपला वाटा हवा यादृष्टीने राज ठाकरे आणि मनसे टीम तयारीला लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत एका पक्षाला तिकीट मिळाले तर इतर २ पक्षातील इच्छुक नाराज होतील. त्यात एखादा सक्षम बंडखोर उमेदवार ‘मनसे’ तिकिटावर उभा राहू शकतो. राज्यात किमान ८ ते १० आमदार निवडून आले तर मनसेचं महत्त्व पुन्हा वाढू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR