सोलापूर : एम आय एम पक्षानेही दिला पाठिंबा. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडही सहभागी सोलापूर प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील हे जालन्यावरून निघाले असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारो मराठे एकत्र आले होते. तदनंतर सर्वजण एकत्रितरित्या छत्रपती संभाजी महाराज चौकांमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मराठ्या मराठा समाजाला नुसता पाठिंबा जाहीर न करता छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड चे मतीन बागवान व त्यांचे सहकारी या मोर्चात सामील झाले आहेत तर एमआयएम पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष फारुक शाब्दी व त्यांचे पदाधिकारी व सहकारी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईकडे निघालेल्या या सर्व मराठा योध्याचा पहिला मुक्काम माढा तालुक्यातील अरण येथे होणार असून उद्या सकाळी पुढील वाटचालीस सुरुवात होणार आहे.
हजारोच्या संख्येने निघालेला मराठा समाज हा पुढे लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये पोहोचेल जिल्ह्यामधून मोहोळ, पंढरपूर, माढा ,करमाळा ,मंगळवेढा आधीसह सर्व तालुक्यातून व शहरातून मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. या आरक्षण मोर्चामध्ये रवी मोहिते, माऊली पवार ,राजन जाधव ,पुरुषोत्तम बरडे,अमोल शिंदे, आनंद जाधव, नागेश ताकमोगे ,बालाजी वानकर, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे मतीन बागवान, श्रीकांत डांगे, तात्या वाघमोडे, विजय पोखरकर , दत्तात्रय मुळे, माझी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, पोपट भोसले ,महेश घाडगे, निशिकांत वाबळे, कृष्णा जगदाळे, राजाभाऊ गवळी, विकास कदम, संतोष गरड ,सुनील शेळके, हेमंत पिंगळे, प्रशांत देशमुख, बाळासाहेब ताकमोगे ,सचिन साळुंखे, जी.के .देशमुख ,रविकांत भोपळे ,राम साठे, उदय पाटील, महादेव गवळी, बाळासाहेब गायकवाड, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, यांच्यासह हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत.