22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरमहायुती सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात

महायुती सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषध आदींची भाववाढ केली. शेती व्यवसाय महाग केला आणि शेतमालाचे भाव पाडले. सातत्याने महायुती सरकार शेतीविरोधी धोरण राबवत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकरी आणि शेतीशी निगडीत सर्वच घटकांनी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या माध्यमातून महायुती सरकारला धडा शिकविण्याकरिता महाविकास आघाडीला भरघोस मतांचा आशीर्वाद द्यावा, असे आवाहन  विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर तालूक्यातील वांजरखेडा व सारसा येथे दि. ६ नोव्हेबर रोजी आयोजित महिला संवाद बैठकीत श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. या प्रसंगी रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिखा धिरज देशमुख, सुनिताताई अरळीकर, दैवशालाताई राजमाने, आशाताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, मागील १० वर्षाच्या काळात महायुती सरकारने सगळी खोटी आश्वासने देऊन महाराष्ट्रातील जनतेला फसवले आहे. भाजपा आणि महायुतीतील सर्वच पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी फटकारले. यामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडला. त्या सर्व घोषणा फसव्या आहेत. एकीकडे शेतमालाचे भाव पडत आहे.महागाई उच्चांक गाठत आहे, बेकारी वाढत आहे तर दुसरीकडे महायुतीच्या सरकारमुळे भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. या भ्रष्टाचारी सरकारला आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. काँग्रेस महाविकास आघाडी नेहमीच शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या हिताचे निर्णय घेत आली आहे त्यामुळे मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीला भरभरून आशीर्वाद द्यावेत.
विकासरत्न विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असताना महाराष्ट्राचा चौफेर विकास केला. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी विकासाच्या योजना खेचून आणल्या. त्यांच्या विकासाचा मंत्र घेऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख जनसामान्यांच्या हिताचे कार्य करीत आहेत. यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार धिरज देशमुख यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी रीड लातूरच्या संस्थापिका दीपशिखा देशमुख म्हणाल्या, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच आमदार धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणचा सर्वगिण विकास केला. लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून आमदार धिरज देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, गोर-गरीब, कष्टकरी, महिला बचत गट यांच्यासाठी विविध योजना राबवत त्यांना मदत केली आहे. पुढील काळातही देशमुख परिवार आपल्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहे. यामुळे २० नोव्हेंबर रोजी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांना मतदानरुपी  आशीर्वाद द्यावेत, असे त्यांनी आवाहन केले.
या वेळी अनिता कदम, राजूबाई काशीद, वच्छालाबाई कदम, पंचफुलाताई निळकंठ, लक्ष्मीबाई कदम, महानंदा शिंदे, दैवशाला गुडापे, हेमलता गुंडरे, वृदांवनताई कदम, लक्ष्मीबाई निळकंठ, अर्चना कदम, उषा कदम, सुवर्णमाला कदम, सुजाता कदम, निकीता कदम, कोमल कदम, शैलजा कदम, सुनंदा भिसे, मयुरी भिसे, कौशल्या भिसे, मीनाबाई जाधव, सुप्रिया भिसे, द्रोपदी भिसे, सिंधू भिसे, इंद्राबाई कोसे, जानकाबाई कदम, बाळूबाई पवार, राधाबाई साळुंके, सुप्रिया मगर, मंगलबाई जाधव, अनिता भिसे, मिना भिसे, ललीता जाधव, कालिंदा भिसे यांच्यासह महिला व काँग्रेस पक्षाचे कार्यकते व गावकरी मंडळींची उपस्थिती
होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR